News
एन. एम. एम. एस. परीक्षेच्या कार्यशाळेकरिता एन. एस. एस. चे स्वयंसेवक
दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी लांजा तालुक्यातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या साठी आवश्यक असणाऱ्या एन एम एम एस या परीक्षेच्या कार्यशाळेकरिता स्वयंसेवक म्हणून उत्तम भूमिका निभावली. ही कार्यशाळा कै. काका सरफरे स्मृती व्याख्यानमाला या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एकूण 15 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला
ऐतिहासिक गढी स्वच्छता
श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शिवगंध प्रतिष्ठान लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली येथील ऐतिहासिक गढी ची स्वच्छता आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. शिवगंधः प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एकूण 45 ते 50 स्वयंसेवक यांनी या अभियानामध्ये भाग घेतला.
रोजगार महामेळावा
न्यू एज्युकेशन सोसायटी, श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा आणि डी-मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 29 उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी 17 विद्यार्थी वेअरहाऊस मध्ये तर 12 विद्यार्थिनींना स्टोअर डिपार्टमेंट मध्ये खरेदी विभागात निवड करण्यात आली.
मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन
मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन आपल्या महाविद्यालयामध्ये करण्यात आले या स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने सलग पाचव्या वर्षी विजेते पथकावर आपले नाव कोरले त्याप्रमाणे मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच वैयक्तिक स्पर्धेमध्ये मुलींमध्ये हर्षदा पांचाळ सुवर्णपदक,ध्रुवीका माजळकर रौप्य पदक तसेच हर्षदा पांचाळ ध्रुविका माजळकर मंजिरी गावडे व जगती मिस्त्री यांची मुंबई विद्यापीठाच्या अंतर विभागीय स्पर्धेसाठी कोकण विभागीय संघामधून निवड झाली त्याचप्रमाणे मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेमध्ये महेंद्र कुडकर यांनी रोप्य पदक पटकावले व त्याची मुंबई विद्यापीठाच्या अंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कोकण विभागीय संघामधून निवड झाली तसेच ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी न्यू एजुकेशन सोसायटी संस्था लांजा व महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो डॉ सुवर्णा पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी आयोजन होण्यासाठी मदत झाली त्याचप्रमाणे महाविद्यालयाची सर्व आजी आणि माजी खेळाडू तसेच
Rojgar Mahakumbh 2026
Rojgar Mahakumbh 2026


श्रीरामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सानिया यादव हिने पटकावला द्वितीय क्रमांक
राज्यस्तरीय पावसाळी कविता स्पर्धेत अथर्व विवेक पाध्ये यांना उत्तेजनार्थ पारितोषिक
‘तेजोवलय’ संस्थेतर्फे दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोजी श्रावणसरी राज्यस्तरीय पावसाळी कविता स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या अथर्व विवेक पाध्ये यांना कल्पक आणि दर्जेदार कविता सादर करून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. अथर्व विवेक पाध्ये यांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 202 स्पर्धक सहभागी झाले होते.
कोवाड येथील राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. सानिया यादव हिने पटकावला तृतीय क्रमांक
कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथील संघाने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी सांघिक चषक पटकावला. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
लांजा महाविद्यालयाच्या संघात द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचा अथर्व विवेक पाध्ये, तृतीय वर्ष कला शाखेची सानिया उदय यादव, द्वितीय वर्ष वाणिज्य (BAF) शाखेची सोनाली मंगेश कदम आणि प्रथम वर्ष कला शाखेची सोनाली गोरे यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडत परीक्षकांची दाद मिळवली.
स्पर्धेत अथर्व विवेक पाध्ये याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तसेच संपूर्ण संघाच्या प्रभावी सादरीकरणामुळे श्रीराम वंजारे महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी सांघिक चषक मिळविण्याचा मान संपादन केला.या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील निबंध, वक्तृत्व व वादविवाद विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश बावधनकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि मार्गदर्शनाला मिळालेले हे यश असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जयवंतभाऊ शेट्ये, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुवर्णा पाटील, प्रा. डॉ. महेश बावधनकर, प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.



















